धक्कादायक ! ‘या’ कारणासाठी ‘तिच्या’ गळ्याला लावले नख

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – हम दोन हमारा एक असा जमाना असताना अजूनही वंशाच्या दिव्यासाठी लोकांचा खटाटोप सुरुच असतो. त्यासाठी मुलगा होईपर्यंत महिलेची एका मागोमाग बाळंतपण होत असतात. सातवीही मुलगी झाल्याने तिच्या गळ्याला नख लावून ठार केल्याचा संशय घाटंजी तालुक्यातील करमना येथे व्यक्त करण्यात आला आहे. या संशयावरुन महसुल व पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत १८ दिवसांच्या मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

करमना या गावातील अशोक श्यामराव शिंदे यांना २८ जून रोजी सातवी मुलगी झाली. १५ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. तिचा दफनविधीही पार पडला. दरम्यान, घाटंजीचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांना निनावी फोन आला. करमना गावातील बालिकेचा मृत्यू नैसर्गिक नाही, तिला नख लावून ठार मारण्यात आले. अशी माहिती फोन करणाऱ्याने दिली. याची खातरजमा केल्यावर मुलीचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली़ त्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची मृतदेह उकरण्यासाठी परवानगी घेतली.

ठाणेदार शुक्ला व नायब तहसीलदार राठोड करमना गावात पोहचले. त्यांच्या उपस्थितीत १८ दिवसांच्या बालिकेचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नेमके सत्य बाहेर येईल. त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. यातील मृत बालिकेचे वडिल रोजगाराच्या शोधात छत्तीसगडला गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या