राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 6 महत्वाचे निर्णय; अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी कॉलेजच्या प्राध्यापकांना लागू होणार 7 वा वेतन आयोग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने बुधवारी (दि. 5) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना लाभ होणार आहे. या निर्णयासोबतच मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत इतरही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

1)  अनुदानित खाजगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू.

2)  सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापना करण्यास मंजूरी.

3)  महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देणार

4)  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागास हस्तांतरीत करण्याचा निर्णय.

5)  पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विलीनीकरण करणार

6)  कोरोनाच्या परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मूलभूत मतदानापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा.