संतापजनक ! पुण्यात ७० वर्षीय आजोबानेच केले ७ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ७० वर्षीय दूरच्या आजोबांनीच ७ वर्षीय मुलावर चॉकलेट घेऊन देण्याच्या अमिषाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार सोमवार पेठेतील ससून क्वार्टर्समध्ये गुरुवारी (३० मे) रोजी उघडकिस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी ७० वर्षीय आजोबाला अटक केली आहे.

तर पिडीत मुलाच्या आईने याप्रकऱणी समर्थ पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

अटक करण्यात आलेला ७० वर्षीय व्यक्ती हा पिडीत महिलेचा मावशीचा पती आहे. तो पिडीत मुलाला चॉकलेट देण्याच्या अमिषाने ससून रुग्णालयातील अंधाऱ्या खोलीत घेऊन गेला. त्यानंतर तेथे त्याच्यावर अंधाराचा फायदा घेऊन अत्याचार केले. तर पुन्हा त्याला त्याच रात्री घराजवळ अंधारात असलेल्या एका रिक्षात घेऊन गेला. दरम्यान त्यानंतर त्याच्यासोबत तेथेही अश्लील कृत्य केले. त्यानंतर मुलाने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कापूरे करत आहेत.