कोरोना व्हॅक्सीनच्या सप्लायपासून मुलांच्या लसीकरणापर्यंत, केंद्र सरकारने प्रत्येक संभ्रम केला दूर; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना व्हॅक्सीनबाबत ( vaccination ) अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झाले आहेत. काही राज्य केंद्रासोबत ताळमेळ असल्याचे सांगत आहेत तर काही राज्य केंद्र व्हॅक्सीन अपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत आहेत. कुणी म्हणत आहे की, केंद्र सरकार परदेशातून व्हॅक्सीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत नाही. याबाबत सरकारकडून वक्तव्य जारी करण्यात आले आहे. सरकारने म्हटले आहे की, अर्धसत्य आणि असत्य पसरवणे आणि चुकीच्या वक्तव्यांमुळे सामान्य माणसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोना व्हॅक्सीनच्या कमिटीचे चीफ आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सर्व संभ्रम पसरवणार्‍या प्रश्नांची उत्तरे दिली.

मूत्रपिंडाचे कार्य चांगले ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, जाणून घ्या

परदेशी व्हॅक्सीन अप्रूव्हलवर नीती आयोगाने दिले उत्तर
अशी चर्चा आहे की, केंद्राने जगभरातील व्हॅक्सीनला vaccination परवानगी दिली नाही? इतकेच नव्हे अशाप्रकारचे मेसेज सुद्धा सोशल मीडियावर वयारल होत आहेत. याचे उत्तर देताना व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, केंद्र सरकारकडून यूएस एफडीए, ईएमए आणि जपानची संस्था पीएमडीएकडून अप्रूव्ह करण्यात आलेली औषधे भारतात आणण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले की, सरकार नियमांमध्ये दुरूस्ती करत आहे. जेणेकरून परदेशांमध्ये प्रभावी ठरलेल्या औषधांना ट्रायलच्या प्रक्रियेतून सूट देता येईल. त्यांनी म्हटले की, देशाच्या ड्रग्ज कंट्रोलरकडे कोणत्याही परदेशी व्हॅक्सीन कंपनीचा अर्ज प्रलंबित नाही.

White Fungal Infection : भारतात ’व्हाईट फंगस’ संसर्ग देत आहे नवीन आरोग्य चिंतांना जन्म

राज्यांवर टाकली जात आहे व्हॅक्सीनची जबाबदारी
एक चर्चा अशीसुद्धा आहे की, केंद्र सरकारने राज्यांवर व्हॅक्सीन vaccination खरेदीची जबाबदारी टाकून हात वर केले आहेत. यावर नीती आयोगाने म्हटले की, हे एकदम चुकीचे आहे. भारत सरकारकडून खरेदी केलेली व्हॅक्सीने जलदगतीने राज्यांना पुरवली जात आहे. जेणेकरून लवकरात लवकर आणि जास्त फ्री व्हॅक्सीनेशन केले जाऊ शकते. तसेच केंद्र सरकारने राज्यांना सूट दिली अहे की ते आपल्या स्तरावर जगभरातून व्हॅक्सीन खरेदी करू शकतात.

Good News : कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक शस्त्र, भारताला जुलैपासून मिळू शकते फायजरची लस

राज्यांना योग्यप्रमाणात व्हॅक्सीन सप्लाय होत नसल्याचा आरोप चुकीचा असल्याचे पॉल यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, व्हॅक्सीन पुरवठ्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. व्हॅक्सीनच्या उपलब्धतेबाबत राज्यांना अगोदरच पूर्ण माहिती दिली आहे. येत्या काही दिवसात व्हॅक्सीनची उपलब्धता वाढेल तेव्हा आणखी जास्त पुरवठा केला जाईल.

बाळासाठी प्लास्टिक नव्हे तर काचेच्या बाटलीतून दूध देणं फायदेशीर, जाणून घ्या


मुलांच्या लसीकरणाचा प्लॅन काय आहे
मुलांसाठी व्हॅक्सीनेशनच्या तयारीवर नीती आयोगाने म्हटले की, सध्या कोणत्याही देशात मुलांसाठी कोरोनाची व्हॅक्सीन vaccination नाही. डब्ल्यूएचओने सुद्धा याबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. नीती आयोगाने म्हटले की, कोरोना व्हायरसबाबत आतापर्यंत जेवढा अभ्यास समोर आला आहे त्यावरून हाच अंदाज लावता येतो की, मुलांना यापासून कोणतेही नुकसान होणार नाही. व्हॉट्सअप ग्रुप्सवर पॅनिक पसरवणार्‍या मेसेजच्या आधारे मुलांना लस देण्याबाबत विचार केला जाऊ नये.

READ ALSO THIS

गृह मंत्रालयानं कोरोनाच्या सध्याच्या गाइडलाइन्सला 30 जुनपर्यंत वाढवलं, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले ‘हे’ निर्देश

‘ही’ 8 लक्षणं सांगतात व्हिटॅमिन C ची कमतरता, डोळ्यांची दृष्टी जाण्याचा धोका; ‘हा’ आहे उपाय

मुंबईत शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांत तुफान ‘राडा’; मनसे पदाधिकार्‍याच्या डोळ्याला गंभीर दुखाप

Pune : महिला अकाउंटटने केला कंपनीत तब्बल 11 लाखांचा अपहार; शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील घटना