China | चीनमध्ये आला भयंकर पूर, छातीपर्यंत पाणी भरलेल्या मेट्रोमध्ये अडकले प्रवाशी

बिजिंग : वृत्तसंस्था –  चीनमध्ये (China) आलेल्या भयंकर पूराची (Extreme floods) अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाली आहेत. मध्य चीनच्या (China) हेनान प्रांताच्या (Henan Province) झेंग्झॉमध्ये (Zhengzhou) मंगळवारी सायंकाळी पाणी जमीनीच्या खालून धावणार्‍या मेट्रोमध्ये सुद्धा भरले आणि लोक छातीपर्यंत पाणी भरलेल्या मेट्रोतून नाईलाजाने प्रवास करत होते. पूरामुळे येथे 12 लोकांचा मृत्यू झाला आणि पाच जखमी झाले. severe floods china people forced ride metro full water till chest

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबो आणि स्थानिक मीडिया आऊटलेट्सने भयावह व्हिडिओ पोस्ट केले, ज्यामध्ये शहराच्या ’लाईन फाईव्ह’वर चालणार्‍या मेट्रोत छातीपर्यंत पाणी दिसत आहे.
प्लॅटफॉर्म चिखलाने भरलेल्या पाण्यात बुडाले आहेत, तर आतील प्रवाशी हैराण आणि घाबरून उभे राहिलेले दिसत आहेत.

विक्रमी पाऊस (Rain) झालेल्या हेनान प्रांतात एक कोटीपेक्षा जास्त लोकांना वाचवण्यासाठी सैनिकांना पाचारण करण्यात आले आहे.
एका यूजरने लिहिले आहे, दुसरा मजला सुद्धा धोक्यात आहे का? माझे आई-वडिल तिथे राहतात, परंतु मी त्यांच्याशी फोनवर बोलू शकत नाही.
त्यांची स्थिती समजू शकत नाही. मी टियांजिनमध्ये आहे आणि माझे आई-वडील झेंग्झॉमध्ये आहेत.

अधिकार्‍यांनी हेनान प्रांतासाठी उच्चतम इशारा स्तर जारी केला आहे कारण या क्षेत्रात पूराचा प्रकोप सुरू आहे.
चीनी लष्कराने (Chinese army) इशारा दिला आहे की झेंग्झॉ शहरापासून जवळपास एक तासाच्या अंतरावर एक धरण मुसळधार पावसात गंभीर प्रकारे नुकसानग्रस्त झाल्यानंतर कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता आहे.

मंगळवारी रात्री पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या (People’s Liberation Army) प्रादेशिक युनिटने इशारा दिला की, सतत पडणार्‍या पावसामुळे लुओयांगमध्ये यिहेतन धरणात 20 मीटरची भेग पडली आहे, – सुमारे सात मिलियन लोकांचे शहर – या जोखमीवर आहे की हे कोणत्याही वेळी धरण कोसळू शकते. इतरही धोकादायक ठिकाणी लष्कराने सैनिक तैनात केले आहेत.

Web Title : severe floods china people forced ride metro full water till chest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 8530 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

Chiplun Flood | कोकणात पावसाचा कहर ! चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती, अनेक घरे पाण्याखाली; 2005 ची पुनरावृत्ती होण्याची भीती

Pune Crime | संदीप मोहोळ खून प्रकरणात सचिन पोटेसह जमीर शेख, संतोष लांडेला जन्मठेप; गणेश मारणे, राहुल तारूसह इतरांची निर्दोष मुक्तता