थंड खाल्ल्यानंतर कान आणि घशात खाज येते का ? असू शकते ‘ही’ समस्या

थंड खाल्ल्यानंतर काही लोकांना नाकात किंवा घशात खाज येण्याची समस्या जाणवते. रात्री झोपताना ज्या लोकांच्या घशात कफ जमा झालेला असतो त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. आज आपण घशात कफ जमा होण्याची आणि थंड खाल्ल्यानंतर कानात खाज येण्याची कारणं जाणून घेणार आहोत.

तुम्हा क्वचितच माहित असेल आपला नाक, कान, घसा यांच्या नसा एकत्रित असतात. ज्या लोकांच्या नाकाच्या आतील भागातील हाड सामान्य आकारापेक्षा मोठे किंवा वाकडे असते त्यांना झोपताना घशात कफ जमा होण्याची समस्या उद्भवत असते. सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा सगळ्यात आधी खोकल्यामुळं घसा साफ व्हायला मदत होते. काही लोक असेही आहेत ज्यांना खोकला येत नाही. यामुळं घशात कफ तसाच जमा राहतो. त्यामुळं सर्वात आधी उठल्यानंतर घसा साफ करायला हवा.

म्हणून थंड खाल्ल्यानंतर कानात खाज येण्याची समस्या उद्भवते.

जर एखाद्याला घशात कफ होण्याची समस्या अनेक वर्षांपर्यंत असेल तर कानाच्या नर्व्समध्ये मॉईश्चर जमा होतं. त्यामुळं नर्व्सला फंगस निर्माण होण्याची शक्यता असते. यानंतर पीडित व्यक्तीनं जर काही खाल्लं तर कानात खाज यायला सुरुवात होते. काहीवेळा ही खाज एवढी तीव्र असते की, त्या व्यक्तीला अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं.

काय काळजी घ्यावी ?

कानात आणि घशात सतत खाज येत असेल तर अशा लोकांनी चहा किंवा गरम पाणी, सूप असं काही पिलं तर आराम मिळू शकतो. कारण यामुळं कान आणि घशातील नर्व्स शेकल्या जातात. जर तम्हालाही अशा प्रकारे खाज येण्याची समस्या येत असेल आणि याचं प्रमाण वाढलं तर सर्वात आधी थंड पदार्थांचं सेवन करणं बंद करा. याव्यतिरीक्त आंबट पदार्थ खाणंही टाळायला हवं. नाकातील हाडामुळं खाज येण्याची समस्या उद्भवते. काही वेळा अनुवांशिकतेमुळंही या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

…तर सर्जरी करावी लागते

या समस्येवर काही उपाय करायचाच असेल तर आईस्क्रिम, थंड पाणी असे पदार्थ खाणं बंद करायला हवं. जर तुम्हाला नाकाच्या हाडाची समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांकडून योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी. जर वेळेत औषध किंवा उपचार घेतले तर ही समस्या कमी होऊ शकते. गंभीर स्थिती असेल तर सर्जरी देखील करावी लागते. जर तुम्हाला सर्जरी करणं टाळायचं असेल तर वेळीच उपचार घेऊन तुम्ही यावर नियंत्रण मिळवू शकता. याशिवाय खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवत योग्य ती काळजी जर घेतली तरीही तुम्ही या आजारापासून दूर राहू शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.