Stomach Pain : पोटदुखीच्या वेळी कधी येते हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ ? ‘हे’ ८ रोग अतिशय धोकादायक

पोलिसनामा ऑनलाईन – तीव्र पोटदुखीच्या वेळी डॉक्टरांकडे जायचे की नाही हा प्रश्न उभा राहतो. अचानक उद्भवणारी पोटदुखीची समस्या सामान्य आहे. जर रुग्णांना आजराबाबत योग्य माहिती असेल तर हेल्पलाइनवर नर्स अथवा डॉक्टरांशी संपर्क करणे योग्य राहील. या लेखात आम्ही पोटदुखी होण्याची अनेक कारणे सांगणार आहोत. त्याचसोबत आम्ही हे ही सांगणार आहोत की, कोणत्या परिस्थितीमध्ये रुग्णांना मेडिकल ट्रीटमेंटची आवश्यकता आहे.

यकृत, पित्ताशय किंवा स्वादुपिंड
जर एखाद्या व्यक्तीला पोटाच्या वरील भागात बरगड्यांच्या खाली दुखत असेल तर यकृत, पित्ताशय किंवा स्वादुपिंडाशी संबंधित लक्षणे आहेत. यात गॅलस्टोन ही सामान्य कंडिशन आहे. गॅलस्टोन पित्त वहिनीला ब्लॉक करते, त्यामुळे यकृताच्या अथवा स्वादुपिंडाच्या कार्यामध्ये समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्याला ‘पॅनक्रियाटाइटिस’ म्हणतात. अशा परिस्थिती जर रुग्णाला ताप, उलट्या हा त्रास होत असेल तर त्यांनी इमरजेंसी कक्षात जावे. ही लक्षणे प्राणघातक ठरू शकतात.

डायवट्रीकुलर डिसीज
कोलोन आजरामुळे डायवट्रीकुलर डिसीज होऊ शकतो. यामुळे पोटात जळजळ आणि इंफेक्शनचा धोका वाढू शकतो. मेडिकलच्या भाषेत याला ‘डायवट्रीकुलाइटिस’ म्हणतात. तसे पाहता डायवट्रीकुलर डिसीज मेडिकल इमरजेंसी नाही. परंतू जर रुग्णांना पोटदुखी, बद्धकोष्ठता, अतिसार, पोटात गोळा येणे या समस्या असतील तर डॉक्टरांशी संपर्क करा.

किडनी स्टोन
किडनी स्टोन हा आजार खूप वेदनादायक आहे. पण हा आजार प्राणघातक नाही. या आजारात रुग्णांना पोटाच्या खालील भागात दुखू लागते. हे दुखणे कमरेपर्यंत पसरते. त्याचबरोबर चक्कर येणे, घाबरणे, मांडीमध्ये वेदना होतात. ही या आजाराची लक्षणे आहेत. या वेदना सहनशक्तीच्या बाहेरील असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिहायड्रेशन
पोटाच्या समस्येत उलट्या आणि अतिसार होऊ शकते. खासकरून लहान आणि वयस्कर व्यक्तींमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. डिहायड्रेशनमध्ये कोरडी त्वचा, ओठ फुटाणे, हृदय धडधडणे अशी लक्षणे दिसून येतात. अशावेळी डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. अशावेळी डॉक्टर नसांद्वारे औषधे देऊन जीव वाचवू शकतात.

अपेंडिसाइटिस
अपेंडिसाइटिस अपेंडिक्सचेच इंफेक्शन आहे. उपचार न मिळाल्यास हा आजार वाढू शकतो. पोटाच्या मधील भागात अचानक तीव्र वेदना होऊन या वेदना डाव्या बाजूला वाढणे हे अपेंडिसाइटिस आजाराचे लक्षण आहे. या आजारात वेदना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. नाभीजवळ हळूहळू होणाऱ्या वेदना काही वेळात वाढू लागतात.अपेंडिसाइटिसच्या वेदना होताच रुगणांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यात डॉक्टर अपेंडिसाइटिस काढण्याचा आणि ऍंटिबायोटीक्स घेण्याचा सल्ला देतात.

रक्तवाहिन्या फुगणे अथवा रक्तस्त्राव होणे
आपले पोट रक्तवाहिन्यांनी भरलेले आहे. यात शरीरातील सर्वात मोठी ‘ऑर्टा’ ही रक्तवाहिनी असते. ऑर्टामध्ये कट लागल्याने अनेक वेळा ऑट्रिक डिसेशनची समस्या होते. पोटात अचानक दुखणे हे पोटदुखीचे मुख्य लक्षण आहे. काही लोकांना श्वास घेण्यात अडचण, हृदयाचे ठोके वाढणे, चक्कर येणे अशा समस्या उदभवतात. पोटदुखीसोबत अशी लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा.

आतड्यांमध्ये अडथळा
टाकाऊ अन्नपदार्थ बाहेर न पडल्याने आतड्यांमध्ये ब्लॉकेज येतात. काही ब्लॉकेजमुळे आतड्यांचे कार्य बंद होऊ शकते. अचानक आलेला हा अडथळा प्राणघातक ठरू शकतो. ट्युमर, इनफ्लामेंट्री बॉवेल डिसीज, हर्निया या आजारात आतड्यांमध्ये ब्लॉकेज येऊ शकतात.

आतड्यांमधील अडथळा प्राणघातक ठरू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे व्हॉल्वउलस आहे. व्हॉल्वउलस तेव्हा विकसित होतो जेव्हा पोटात कोलाम होणे प्रारंभ होईल. अशावेळी जर रुग्णाला योग्य वेळेत इलाज मिळाला नाही तर व्हॉल्वउलस मृत्यूचे कारण ठरू शकते. याची प्रमुख लक्षणे म्हणजे पोटदुखी, पोटात गोळा येणे, पोटाला सूज येणे, ताप, ठोके वाढणे ही आहेत. अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे उपचार करा.