दिल्ली – NCR सह काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, अफगानिस्तानमध्ये 6.0 ची तीव्रता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली एनसीआर समवेत उत्तर भारताच्या अनेक भागामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर होती. तसेच जम्मू काश्मीरच्या काही भागात देखील भूकंपाचे जोरदार झटके बसल्याची माहिती मिळतेय. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान असल्याचे समजते. अफगाणिस्तानमध्ये भूकंपाची तीव्रता 6.0 इतकी प्रचंड होती.

पंजाब आणि काश्मीरसह उत्तर भारतामध्ये भूकंपाचे प्रमाण इतके तीव्र झाले की लोक आपल्या घराबाहेर पडले. दिल्ली आणि एनसीआरमध्येही मोठे गोधळाचे वातावरण तयार झाले होते. या ठिकाणी भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की लोक घर आणि आपल्या कार्यालयातून थेट बाहेर येऊन रस्त्यावर थांबत होते.

हिंदुकुश भागात भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी नोंदवण्यात आली. जमिनीच्या 255 किलोमीटर खाली भूकंपाचे केंद्र होते. पाच वाजून नऊ मिनिटांनी हा भूकंम्पाचा जोरदार झटका जाणवला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/