काय सांगता ! होय, ‘सेक्स’च्या आहारी गेलेल्या तरुणाने केला ‘स्पा सेंटर’वर हल्ला, 8 महिलांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अमेरिकेच्या अटलांटामधील एका स्पा सेंटरमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 6 आशियाई महिलांचा समावेश असल्याने वर्णद्वेषातून हा हल्ला झाला असावा अशी भीती वर्तवण्यात येत होती. पण या हल्ल्याचे भलतंच कारण समोर आले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तरुणाने आपण सेक्सच्या आहारी गेल्याने हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे.

एरॉन लाँग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लॉंंगने सांगितले की, त्याला सतत या स्पा सेंटरमध्ये जायची इच्छा होत होती. यामुळे त्याची सेक्स करण्याची इच्छा वाढली होती. सेक्सची इच्छा कमी करण्यासाठी त्याला स्पा सेंटर उध्वस्त करायचे होते असे लॉंगने म्हटले आहे. आरोपी लाँग हा सेक्सचे व्यसन सोडवण्यासाठी एका पुनर्वसन केंद्रात उपचार घेत होता. जवळपास 6 महिने तो तिथे असल्याचंही पोलिसांना तपासात समोर आले आहे.

वासनांध, लिंगपिसाट आरोपीने भयंकर कृत्य केल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील हॉलीवूडचा दिग्दर्शक हार्वी विन्स्टीन, सिरीअल किलर टेड बन्डी, 3 मुलींचे अपहरण करणाऱ्या एरिअल कॅस्ट्रो आरोपींनी आपण सेक्सच्या आहारी गेल्याने तसेच पॉर्न व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागल्याने गुन्हा केल्याचे कबुल केले होते. मात्र सेक्सच व्यसन लागलेल्या व्यक्तींचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी ही बाब मान्य करण्यास नकार दिला आहे. या दोन्हीचा मानसिक आजाराशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. काही शास्त्रज्ञांच्या मते आपला गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगार अशा पद्धतीचे बहाणे करतात.