सर्चचा sex education कार्यक्रम आता YouTube वर देखील उपलब्ध, संचालिका डॉ. राणी बंग करणार मार्गदर्शन

0
244
sex education program of search organisation is now available on youtube
Dr. Rani Banga

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील तरुणाईला गेल्या 3 दशकांपासून लैंगिक शिक्षण ( sex education ) देणाऱ्या सर्च संस्थेने आता हा कार्यक्रम निर्माण फॉर युथ या यू-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध करुन दिला आहे. 26 मेपासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून प्रत्येक भाग 30 मिनिटांचा असणार आहे. दर आठवड्याला एक भाग यू-ट्यूबवर उपलब्ध होईल. प्रसिध्द समाजसेविका आणि सर्चच्या संचालिका डॉ. राणी बंग या स्वत: वैद्यकीय ज्ञान व सामाजिक भान सांभाळून तरुण- तरुणींना मार्गदर्शन करणार आहेत.

White Fungal Infection : भारतात ’व्हाईट फंगस’ संसर्ग देत आहे नवीन आरोग्य चिंतांना जन्म

डॉ. राणी बंग आणि त्यांचे सहकारी गेल्या 30 वर्षापासून संस्थेच्या माध्यामातून राज्याच्या विविध भागांत तारुण्‌यभान हा ‘प्रेम, लैंगिकता sex education व प्रजनन प्रबोधनाचा कार्यक्रम घेत आहेत. आजच्या तरुणाईने स्वभान जोपासताना इतर नातेसंबंधांचे संवेदनशीलता आणि जबाबदारीपूर्वक संवर्धन करावे, त्यामुळे तरुणाई अधिक निरोगी व आनंदपूर्ण होईल, तसेच समाजातील लैंगिक गैरसमज, sex education स्वैराचार व अत्याचाराला आळा बसेल हा त्यामागचा हेतू आहे. गेल्या 30 वर्षात सर्चच्या कार्यकर्त्यांनी राज्यात 500 शाळा, महाविद्यालयांमध्ये 50 हजार कुमारवयीन व तरुण मुला-मुलींच्या 3 दिवसीय शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या आहेत. आता हा कार्यक्रम युवांना सुलभरित्या उपलब्ध व्हावा म्हणून निर्माण फॉर यूथ या यू-ट्यूब चॅनलवर उपलब्ध करुन दिला आहे.

READ ALSO THIS

मूत्रपिंडाचे कार्य चांगले ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, जाणून घ्या

‘ही’ 8 लक्षणं सांगतात व्हिटॅमिन C ची कमतरता, डोळ्यांची दृष्टी जाण्याचा धोका; ‘हा’ आहे उपाय

बाळासाठी प्लास्टिक नव्हे तर काचेच्या बाटलीतून दूध देणं फायदेशीर, जाणून घ्या

Good News : कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक शस्त्र, भारताला जुलैपासून मिळू शकते फायजरची लस