महिला ‘पार्टनर’ला तुमच्याकडून असते ‘या’ 5 गोष्टींची जास्त ‘अपेक्षा’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सेक्स हा मानवी जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे नात्यामध्ये सेक्स महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तुमच्यातील बाँडिंगमध्ये सेक्सचाही बराच वाटा असतो. त्यामुळे आज आपण हे जाणून घेणार आहोत की, सेक्स दरम्यान महिला पार्टनरच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नोटीस केल्या किंवा असे काय आहे जे तुम्ही केले तर तुमच्यातील नातं आणखी घट्ट होईल. तुमची पार्टनर तुमच्यासाठी पागल होईल. या गोष्टी अशा आहेत ज्यांची महिला पार्टनर नेहमीच अपेक्षा करत असतात.

1) फोरप्ले आणि आफ्टरप्ले-
महिलांसाठी सेक्स ही केवळ शारीरिक नाही तर भावनिक प्रक्रिया असते. त्यामुळे त्यांना हा खेळ लगेच संपवणं आवडत नाही. महिलांना केवळ पेनिट्रेशन आणि ऑर्गेजम हवे असते अजिबात नाही. जसा फोरप्ले महत्त्वाचा असतो तसाच आफ्टरप्लेही महत्त्वाचा आहे. त्यामुळे सेक्सनंतर लगेच उठून जाऊ नका किंवा पार्टनरला दूर लोटू नका. हे नात्यासाठी घातक ठरू शकतं.

2) सन्मान-
महिलांना सन्मान हवा असतो. त्यामुळे सेक्सनंतर त्यांना आदराने जवळ घ्या. यातून तुमचं प्रेमही दिसून येईल. जर सेक्सनंतर तुम्ही लगेच त्यांना दूर केलं तर तुम्ही तिच्याकडे गरज म्हणून पाहता असे पार्टनरला वाटू शकते. त्यामुळे तिला जवळ घ्या आणि तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला सांगा. यामुळे तुमचं नातं आणखी घट्ट होईल.

3) या गोष्टी नोटीस करा-
महिला लाजाळू असतात त्यामुळे तुम्ही तिचा मूड झाला आहे हे तिच्या वागण्यावरून ओळखायला हवं. तुमच्या पार्टनरचं बोलणं, तिचं बघणं आणि तिचा श्वास नोटीस करा. यावरून तुम्हाला अंदाज येईल की तिचा मूड झाला आहे किंवा नाही ते. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही थेट विचारू शकता. काही महिलांना हे देखील आवडू शकतं.

4) सरप्राईज द्या-
महिलांना आणखी काही आवडत असेल तर ते म्हणजे पार्टनरने दिलेले सरप्राईज. यातून तुमचा तिच्यावर किती जीव आहे आणि तुम्ही पार्टनरला किती महत्त्व देता हे दिसून येतं. तुम्ही जर काही हॉट सरप्राईज दिलं तर त्यांना नक्कीच आवडेल. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

5) इतर गोष्टींनाही महत्त्व द्या-
महिलांना खूप काही सांगायचं असतं. त्यामुळे त्या काही बोलत असतील तर त्यांना अडवू नका. त्यांना ऐका. अशाने त्या तुमचा जास्त आदर करतील. त्यांचं ऐकल्याने त्या तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. कारण यामुळे त्यांना तुमच्यासोबत जास्त कंफर्टेबल वाटतं. याने दोघांमधील प्रेम अधिक वाढेल. फक्त बेडरूममध्येच नाही तर बेडरूमच्या बाहेरही तुम्ही त्यांना ऐकायला हवं. शेअरींग नात्यात महत्त्वाचं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/