लैंगिक संबंध ठेवताना लाळ, खोबरेल तेल, पेट्रोलियम जेली अन् बॉडी लोशनचा वापर करताय ? होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन – शारीरिक संबंध ठेवताना व्हजायनात योग्य तो ओलावा नसल्यानं ल्युब्रिकेशनसाठी काही लोक लाळ, बॉडी लोशन, खोबरेल तेल किंवा व्हॅसलीन तसेच पेट्रोलियम जेलीचा वापर करतात. परंतु यामुळं व्हजायनाची पीएच लेव्हल बिघडते. याचा शरीरावरही वाईट प्रभाव पडतो. याबद्दल आज सविस्तर माहिती घेऊयात.

1) लाळ – अनेक कपल पार्टनरला वेदना नको म्हणून किंवा चांगल्या संबंधांसाठी लाळेचा वापर करतात. परंतु यामुळं व्हजायनल इंफेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. कारण लाळेत अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात.

2) पेट्रोलियम जेली – यामुळं व्हजायनाची पीएच लेवल बिघडते. इतकंच नाही तर याच्या वापरामुळं खाज येण्याचीही समस्या उद्भवते.

3) खोबरेल तेल – खोबरेल तेल गुणांचा खजिना आहे असं सारेच मानतात. हेच कारण आहे की, अनेक कपल संबंध ठेवतान ल्युबसाठी याचा वापर करतात. परंतु काहींसाठी हे नुकसानदायक ठरू शकतं. यामुळं व्हजायनात इंफेक्शन होण्याची शक्यता असते.

4) बॉडी लोशन – ल्युबसाठी जर याचा वापर केला तर यात असणाऱ्या केमिकल्समुळं व्हजायनाच्या संवेदनशील त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून ते प्रायव्हेट पार्टवर लावणं टाळावं.