धक्कादायक ! ‘सेक्स रॅकेट’ चालविण्याचा आरोप असलेल्या ‘अरब’पतीची जेलमध्ये आत्महत्या, देशात खळबळ

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप असलेल्या एका अमेरिकन अरबपतीने कारगृहात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील अनेक दिवसांपासून अमेरिकन अरबपति जेफर एप्सटाइन (वय-६६) सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोपाखाली त्यांना शिक्षा झाली. त्यांना मेट्रोपॉलिटन करेक्शनल सेंटर मधील आपल्या सेलमध्ये त्यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

जुलैमध्ये न्यूयॉर्कच्या एका न्यायालयात हजर झाल्यानंतर एप्सटाइन यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय आणि त्यांची तस्करी करत असल्याचा आरोप एप्सटाइन याच्यावर लावण्यात आला होता. दरम्यान, त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले होते. मात्र, न्यायालयाने त्यांना ४५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

एप्सटाईन यांनी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर जुलैमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या गळ्यावर निषाण आढळून आले होते. मेट्रोपॉलिटन करेक्शनल सेंटर चा उपयोग ट्रायल दरम्यान आरोपींना ठेवण्यासाठी करण्यात येतो.

आरोग्यविषयक वृत्त