बंद खोलीत 3 युवकांसोबत 13 पोरी नको ‘त्या’ अवस्थेत पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’, 13 मुली, 2 संचालिका आणि 13 ग्राहक ‘ताब्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील ताजगंजमधील एका घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. यामध्ये स्थानिक मुलींसह राजस्थानमधील विविध शहरांतील मुलींचा देखील समावेश होता. रविवारी संध्याकाळी पोलिसांनी आणि एका स्थानिक एनजीओने छापा मारून एका घरातून १३ मुली, दोन संचालिका आणि १३ ग्राहकांना ताब्यात घेतले.

फ्रीडम फर्म संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी मुलींना जबरदस्ती बंधक केले जाऊन त्यांच्याकडून बळजबरी वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी चार वाजता छापा मारला. या ठिकाणी १३ मुलींसह ३ ग्राहक आढळून आले. राजस्थानमधील धौलपुर, मनियां आणि बूंदी मधील काही मुली असून काही मुली स्थानिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केल्यानंतर सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. मुलींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्या त्यांच्या मर्जीने या ठिकाणी राहत होत्या. मागील एक महिन्यापासून या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु होता. पोलिसांनी या प्रकरणी ३ ग्राहक आणि २ संचालिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुलींना महिला सुधार केंद्रांमध्ये पाठवण्यात येणार आहे.

संचालिका घेत होत्या कमिशन

मुलींनी दिलेल्या माहितीनुसार या दोन संचालिका या मुलींकडून प्रत्येक दिवशी १५० रुपये कमिशनच्या रूपात घेत होत्या. राहण्याची आणि खाण्याची सुविधा या दोघींकडूनच केली जात असे.

अनेक ठिकाणी होत आहे व्यवसाय

पोलिसांनी अटक केल्यानंतर या दोघी संचालिका पोपटासारख्या बोलू लागल्या. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी त्या वेश्याव्यवसाय करून घेत होत्या. अनेक वर्षांपासून त्या या क्षेत्रात असून पोलिसांनी त्यांचे इतर ठिकाणी चालणारे अड्डे देखील उध्वस्त करण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त