उच्चभ्रू वसाहतीत चालणाऱ्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, 4 तरुणींची सुटका

औरंगाबाद : पोलीसमाना ऑनलाइन – औरंगाबाद शहरातील उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका घरामध्ये छापा टाकून तीन महिला दलालांसह चार ग्राहकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये शहरातील प्रसिद्ध मॉलचा मॅनेजर आहे. या कारवाईत चार तरुणींची सुटका करण्यात आली असून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

अजय सुभाष साळवे (वय-23), ज्ञानेश्वर सर्जेराव जराड (वय- 42), मोहम्मद साजिद अली (वय-29) आणि अमोल दामू शेजुळ (वय-29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील बीड बायपास परिसरातील राजेश नगरमध्ये राहणाऱ्या संजय कापसे आणि एक महिला परराज्यातील मुलींना डांबून ठेऊन सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. राजेश नगरमधील एका रो-हाऊस आणि बंगल्यात हे सेक्स रॅकेट मागील अनेक दिवसांपासून सुरु असल्याचे समोर आले. पोलिसांनी या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये दोन आसाम, एक हैदराबाद आणि एक स्थानिक आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या कारवाईत चौघांना अटक करुन घटनास्थळावरून विदेशी मद्याचे 10 बॉक्स जप्त केले आहेत. याची किंमत सुमारे 1 लाख 44 हजार 930 रुपये आहे. कारवाई दरम्यान सापडलेल्या महिलांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपींवर पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, उच्चभ्रू वसाहतीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com

 

You might also like