दिवसा ‘शाळा-कॉलेज’ आणि रात्री सेक्स रॅकेट, किरायाच्या घरात ‘गोरखधंदा’

इटवा (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा महिला पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये अनेक मुला-मुलींना नको त्या अवस्थेत पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये काही मुली शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. तसेच यामध्ये काही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. ही कारवाई उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे. पोलीस सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा यांनी सांगितले की, जनपथ येथे मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा आणि महिला पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. छाप्या दरम्याने मुले-मुली नको त्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी मुला-मुलींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुली आहेत. भाड्याची खोली घेऊन त्याठीकाणी सेक्स रॅकट चालवत होते. पोलिसांनी कारवाई दरम्यान मुलींकडून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या मुली शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचे समुपदेशन करून ते या व्यवसायात कोणत्या कारणामुळे आले आहेत. याची माहिती घेतली जाणार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

You might also like