स्वारगेट येथील मॉलच्या ‘स्पा सेंटर’ मध्ये सेक्स रॅकेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

स्वारगेट येथील शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल या ठिकाणी स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून एका महिलेची सुटका केली आहे.  दोघांना अटक करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19aed2f2-c6c3-11e8-b940-65b82dca6211′]

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गोपाळ कमल हलदर, रॉबिन थॉमस (दोघे रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  शौकत अली खान (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार शकिल सत्तार शेख यांनी फिर्याद दिली आहे.

पुणे/पिंपरी : ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तडीपार गुंडाकडून लैंगिक अत्याचार

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल येथे आमंत्रा स्पा हे मसाज सेंटर आहे. गेल्या २ महिन्यांपासून हा स्पा सुरु करण्यात आला होता. या ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाला मिळाली. त्यांनी बनावट ग्राहक पाठवले. मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याचा बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी त्यावर छापा टाकला. या ठिकाणी एका ३५ वर्षाची महिला तेथे आढळून आली. तिला त्यांनी नोकरीला ठेवून पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यात येत होता. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक पंडित अधिक तपास करीत आहेत.

[amazon_link asins=’B01FO0B5T0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’12f441f1-c6c3-11e8-aea2-c7b6cfc9485c’]