बिबवेवाडीत मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन- बिबवेवाडीतील चंद्रिका सोसायटीमधील मसाज सेंटरवर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत पुर्वेकडील राज्यांतील  चार तरुणींची सुटका केली. तर याप्रकरणी मसाज सेंटर चालविणाऱ्या तिघांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.शाम फासगे, प्रिती फासगे, अतलू मेलू खामो (२२, कोहिमा, नागालॅंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतलू खामो ही बिबवेवाडीतील चंद्रिका सोसायटीमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली तरुणींकडून वेश्या व्यवयास करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसानी तेथे छापा टाकून नागालॅंड, मिझोरम, येथील चार तरुणींची तेथून सुटका केली. त्यांची रवानगी रेस्क्यू होममध्ये करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे,सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे व कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.