ढाब्यामध्ये सुरू होते सेक्स रॅकेट; मालकाला पोलिसांनी दिले होते संरक्षण

गुरुदासपूर : वृत्तसंस्था –  एका ढाब्यात सुरू असलेल्या देह व्यापराशी संबंधित केसमध्ये पोलिसांनी छापा मारला असता, आश्चर्यकारक खुलासा झाला. ढाब्याच्या मालकाला पोलिसांनी गनमॅनचे संरक्षण दिले होते. हे प्रकरण पंजाबच्या गुरदासपुर जिल्ह्यातील आहे.

डीएसपी दीनानगर यांनी पोलीस पथकासह छापा मारला. मागील मोठ्या कालावधीपासून ढाब्यात देह व्यापार सुरू होता. पोलिसांनी छापा मारून एका प्रेमी जोडप्यासह हॉटेल मालकाला अटक केली आहे आणि मुली पुरवणारी एक महिला सध्या फरार आहे.

दीनानगरचे पोलीस ठाणे प्रभारी कुलविंदर सिंह यांनी सांगितले की, येथील डीएसपींना माहिती मिळाली होती की, दीनानगरच्या बस स्थानकाजवळ छिंदा ढाब्यामध्ये देह विक्रीचा धंदा सुरू आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारला असता, घटनास्थळी एक तरुण आणि एक तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले, त्यांना अटक करण्यात आली. तसेच हॉटेल मालकालासुद्धा अटक करण्यात आली. हॉटेलमध्ये मुली सप्लाय करणारी एक महिला अजूनही फरार आहे. सध्या पोलिसांनी चार लोकांवर केस दाखल केली असून, तपास सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ढाबा मालक शिवसेनेचा पंजाब उपाध्यक्ष आहे आणि पोलिसांनी त्यास सुरक्षासुद्धा दिली होती, परंतु याबाबत पोलिसांनी काही बोलण्यास नकार दिला.

शिवसेनेच्या इतर नेत्यांनीसुद्धा प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ चालवली आहे. मात्र, काही नेत्यांनी दबक्या आवाजात कॅमेर्‍यासमोर मान्य केले की, ढाबा मालकाकडे पंजाब उपाध्यक्षपद आहे आणि पोलिसांनी त्यास गनमॅनची सुरक्षा दिली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी त्याला पदावरून काढण्यात आले होते.

You might also like