अरे बापरे ! चक्‍क बंगल्यात ‘हाय प्रोफाईल’ सेक्स रॅकेट, महिलेसह 7 जण ‘गोत्यात’

श्रीरामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बंगल्यात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करून सात जणांना अटक केली आहे. ही कारवाई श्रीरामपूर शहर पोलिसांनी शहरातील गोंधवणी परिसरातील एका बंगल्यामध्ये केली. याप्रकरणी एका महिलेसह बंगल्याच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आंबट शौकिनांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींवर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुलींना अनैतिक मार्गाला लावून देहविक्री करण्यात येत असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारावई करून लक्ष्मी उर्फ प्रिती राजेश माखेजा (वय ३२, गोंधवणी), अशोक दामोधर देशमुख (गोंधवणी) तसेच नानासाहेब जगन्नाथ शेळके (वय २९, लाडगाव, ता.श्रीरामपूर), प्रकाश विलास दौंड (वय ३६, मातापूर), श्रीकांत कैलास अनारसे (वय २४, वडाळा महादेव), सतीश दिलीप मेटे (वय २२, उंबरगाव), अनिल जगन्नाथ शेळके (वय २५, लाडगाव) यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी माखेजा ही महिला गोंधवणी येथे देशमुख यांचा बंगला भाड्याने घेऊन रहात होती. ती मूळची बेलापूर येथील असून कोपरगाव येथे तिचे सासर आहे. ती सध्या एकटी राहते. आरोपी नानासाहेब शेळके व प्रकाश दौंड यांच्यासह आर्थिक फायद्यासाठी पीडित मुलींकडून ते देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते. पीडित २४ वर्षीय मुलगी औरंगाबाद येथील असून पोलीस तिच्याकडे चौकशी करत आहेत. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –