उच्चभ्रू वसाहतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; दोन दलाल अटकेत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश केला. सातारा परिसरातील द्वारकादास नगरमधील उच्चभ्रू वसाहतीमधे सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी दोन दलालांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारकादास नगरमध्ये शेजारी-शेजारी असलेल्या दोन रो-हाऊसमध्ये सेक्स रॅकेट सुरु होते. मुंबई येथून मुलींना औरंगाबाद येथे आणून त्यांच्याकडून देहविक्री करवून घेतली जात होती. हा प्रकार मागील अनेक महिन्यापासून सुरु होता. पोलिसांना याची माहिती मिळताच सातारा आणि पुंडलीकनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

पोलिसांच्या या संयुक्त कारवाईत तुषार राजपूत आणि प्रवीण कुरकुटे या दोन दलालांसह दोन मुलींना अटक केली आहे. तुषार आणि प्रवीण राज्यातील विविध भागातील मुलींना औरंगाबाद शहरात आणून त्यांच्याकडून देहविक्री करून घेत होते. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

पक्षाने प्रदेशाध्यक्षपद न दिल्याने माने गंभीर आरोप करताहेत – गोपीचंद पडळकर यांचा पलटवार

काँग्रेसचे आमदार अमिता चव्हाणांच्या मतदार संघातच काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

You might also like