एव्हीझेड स्पा मधिल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

औंध येथील एव्हीझेड स्पा आणि स्कीन केअर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभाग आणि चतु:श्रृंगी पोलीसांनी संयुक्तीकरित्या बुधवारी पावणे पाचच्या सुमारास केली. या कारवाईत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून दिल्ली आणि माहाराष्ट्रातील चार मुलींची सुटका करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44a2fc53-b1bc-11e8-a5a0-8b8bf0817a0d’]

अशुली चिफखोनामी लोहे (वय-२७ रा. रक्षालेखा सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

औंध येथील डीपीरोडवरील सिताईपार्क येथे एव्हीझेड स्पा आणि स्कीन केअर सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक नितीन लोंढे यांना मिळाली. त्यानुसार या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खातरजमा करुन पोलिसांनी छापा टाकला. छाप्या दरम्यान दिल्ली आणि महाराष्ट्रातील चार मुलींची सुटका करुन वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या लोहेला अटक करण्यात आली.  सुटका करण्यात आलेल्या चार मुलींना रेस्क्यु होम याठीकाणी ठेवण्यात आले आहे. छाप्या दरम्यान पोलिसांनी पाच हजार रुपये रोख चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4b151140-b1bc-11e8-b790-3b4379722082′]

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, गुन्हे-२चे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, पोलीस उप निरीक्षक आनंत व्यवहारे, योगिता कुदळे, नितीन लोंढे, नरेश बलसाने, ज्ञानेश्वर देवकर, राजाराम घोगरे, नामदेव शेलार, नितीन तरटे, कविता नलावडे, गीतांजली जाधव, रुपाली चांदगुडे, सुनिल नाईक, राजेंद्र ननावरे तसेच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे व त्यांच्या पथकाने केली.

मुदतीपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त 

जाहिरात