पुण्याच्या बिबवेवाडीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पैशांचे अमिष दाखवून दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या चार जणांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई नुकतीच अप्पर बिबवेवाडी येथील नगश नगरमध्ये करण्यात आली. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

विद्या मधुसूदन कांबळे (वय-३२), सुधाकर ओंकार जोहरे (वय-२७), नवनाथ दामोदर भगत (वय-३२), मधुकर श्रीपती यादव (वय-३९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6c07eb0-cf97-11e8-be63-4bd85a2be43e’]

बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई धुमाळ व शितोळे यांना गणेश नगर येथील एका घरामध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घरावर छापा टाकून दोन महिलांची सुटका करुन चौघांना अटक केली. सुटका करण्यात आलेल्या महिलांची हडपसर येथील रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपींनी पीडित महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होते. मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजीवीका भागवत होते. आरोपींविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279,B071HWTHPH,B0784BZ5VY,B01M0JSAFU,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c224c0e0-cf97-11e8-a0c6-7918c8792635′]

ही कारवाई पुर्व विभागाचे प्रभारी अपर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ -५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, पोलीस शिपाई शितोळे, शिंदे, देवकाते, कुलकर्णी, महिला पोलीस शिपाई मोटे, गायकवाड यांच्या पथकाने केली.