‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, 17 वर्षीय मुलीसह 39 महिलांची सुटका

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नवी मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका एनजीओनं पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या सेक्स रॅकेटमधून 40 महिलांची सुटका करण्यात आली आहे. टापा टाकलेलं हॉटेल एपीएमसीमधील मॅफ्को मार्केटमध्ये असून ब्लू स्टार हॉटेल असं त्या हॉटलेचं नाव आहे.

एका एनजीओनं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांना सेक्स रॅकेटबद्दल माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ब्लू स्टार हॉटेलवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

एका व्यक्तीनं हॉटेलमध्ये येत मागणी केल्यानंतर हॉटलचे कर्मचारी एका मुलीला जवळच्या प्रिन्स लॉजमध्ये पाठवण्यासाठी तयार झाले. त्या व्यक्तीकडे त्यांनी 5 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतर ती व्यक्ती लॉजवर गेली. तिथे एक मुलग वाट पहाताना दिसली.

वेटर्स नव्हे तर सेक्स वर्कर
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील याबाबत बोलताना म्हणाले, “सदर मुलीनं स्वत:बद्दल माहिती सांगताना ती 17 वर्षांची असल्याचं सांगितलं. इतकेच नाही तर तिथे काम करणाऱ्या आणखी काही वेटर्सही सेक्स वर्कर म्हणून काम करत होत्या. पोलिसांनी नंतर बारवरही छापा टाकला आणि तेथून 39 महिलांची सुटका करण्यात आली.”

Visit : Policenama.com