पुणे : दापोडीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – भोसरी, दापोडी येथील मंत्री निकेतन मधील एका घरात सुरु असणारा वेश्या व्यवसाय पोलिसांनी छापा टाकून बंद केला. पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी पावणेसहाच्या सुमारास करण्यात आली.

रेणू रमेश भाटिया (६३, रा. दापोडी), पेपसिंह शेतानसिंह (२५, रा. दापोडी, मूळ रा. राजस्थान), रमेश शिवाजी सूर्यवंशी (२७, रा. थेरगाव मूळ रा. लातूर), बंडू उत्तम चव्हाण (२५, रा. सुसगाव, मूळ रा. नांदेड), मारुती बळीराम शिंदे (३५, रा. रहाटणी मूळ रा. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी मधील मंत्री निकेतन येथे एका घरामध्ये तीन महिलांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. पोलिसानी सापळा रचून छापा टाकला असता हा प्रकार उघडकीस आला. आरोपी ग्राहकांकडून मिळणारे पैसे स्वतःच्या फायद्याकरिता घेऊन त्यावर आपली उपजीविका चालवत. तीन महिलांची सुटका करण्यात आली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.