पुण्यात ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश ; दोघांना अटक, दोघींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देह विक्रय करण्यासाठी पुण्यात मुलींना घेऊन आलेल्या दोन एजंटांना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अटक केली. तर त्यांच्या ताब्यातून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

शाम उर्फ राम पांडूरंग बोरुळे (वय २७, रा. भैरवनाथनगर, किरकटवाडी) व नयन पद्म नरवडे (वय २४, सुंदर सोसायटी, हांडेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील ब्रिजसमोर वडगाव बु. येथे दोन एजंट देह विक्रयाकरता दोन मुली घेऊन येणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तेथे सापळा रचून छापा टाकला. तेव्हा शाम बोरूळे आणि नयन नरवडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून दोन सज्ञान मुलींची सुटका करण्यात आली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, कर्मचारी नामदेव शेलार, राजाराम घोगरे, सचिन शिंदे, महिला पोलीस कर्मचारी स्वानी यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा
#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’
#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’