खळबळजनक ! पुण्यातील उच्चभ्रु नांदेड सिटी जवळील मॉलमध्ये चालु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उच्चभ्रु असलेल्या नांदेड सिटी जवळील मॉलमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली चालु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. मसाज सेंटरमध्ये थायलंडच्या ५ युवती आणि व्यवस्थापक आढळून आला असून त्यांच्याकडे चौकशी चालु आहे.

ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नांदेड सिटी जवळील मॉलमध्ये ऑर्चिड फाइड स्पा नावाचे मसाज सेंटर असून त्यामध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालु असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने मसाज सेंटरवर छापा टाकला. कादर शेख (रा. पापडे वस्ती, हडपसर) याच्या सांगण्यावरून व्यवस्थापक अक्षय रामेश्वर ससेमल (रा. नांदेड सिटी) हा मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालवित होता. पोलिसांनी अक्षयला अटक केली असून शेख हा फरार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. उच्चभु्र असलेल्या नांदेड सिटी जवळच्या मॉलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like