लॉजमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

खामगाव (शेगाव) : पोलीसनामा ऑनलाईन-  लॉजमध्ये सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई शेगावातील येथील भाग्यश्री लॉजमध्ये आज (शनिवार) करण्यात आली. या कारवाईत दोन महिला, लॉज व्यवस्थापकासह एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

लॉज व्यवस्थापक हुसेनखान असगर खान (वय – २७ रा. म्हाडा कॉलनी, शेगाव) आणि नितीन अरूण कळंके (वय -३३ रा. धनगर नगर, शेगाव) यांच्यासह दोन पिडीतांना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने शेगावातील भाग्यश्री लॉजवर छापा मारला. त्यावेळी तिथे लॉज व्यवस्थापक हुसेनखान खान आणि नितीन कळंके हे दोघेजण दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होते. पोलिसांनी दोघांसह दोन पिडीतांना ताब्यात घेले. त्यांच्याजवळून ४ मोबाईल, २३ हजार ८०० रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी हुसेन खान तसेच नितीन कळंके यांच्या विरोधात अनैतिक प्रतिबंधक व्यापार अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल केला.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, मनोज सुरवाडे, संतोष माने, निलेश डाबेराव, चंद्रकांत बोरसे, नितीन भालेराव, प्रदीप मोठे, देवेंद्र शेलके, सुधाकर थोरात यांच्या पथकाने केली.