स्वारगेट परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून स्वारगेट परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बांग्लादेशी तरुणींना पुण्यात आणून त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना सामाजिक सरुक्षा विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तर दोन बांग्लादेशी तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

अतिक खान साहेब खान (२४, हैदरपुर, बादूरिया जि. उत्तर चोवीस परगना, प. बंगाल) व अकिबूर नजरुल शेख (२४, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांसह कविता नावाची महिला व अज्ञात एजंटविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांग्लादेशी तरुणींकडून दोनजण स्वारगेट येथील जेधे चौक परिसरात वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसानी तेथे छापा टाकला तेव्हा आतिक खान, साहेब खान व अकिबुर नजरुल शेख हे दोघे दोन बांग्लादेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर तेथून पोलिसांनी पॅन कार्ड, आधार कार्ड, व ३ हजार रुपये, ३ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. त्यावेळी त्यात दोन्ही तरुणींचे आधार कार्ड व पॅन कार्ड हे खोट्या माहितीच्या आधाऱे तयार करून घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही तरुणींची सुटका केली असून त्यांची रवानगी रेस्क्यू होममध्ये करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त भानुप्रताप बर्गे, यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे व त्यांच्या पथकाने केली.

कार्ड क्लोनिंग करणाऱ्या नायजेरियन टोळीचा पर्दाफाश