सिंहगड रोडवरील स्वागत लॉज मधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सिंहगड रोडवरील नवले ब्रीजजवळ असणाऱ्या स्वागत लॉजवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. महिलांना वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या दोघांना अटक करुन तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.मयंककुमार भगवान पांड (वय २४, रा. मु. फाजनगंज, पो. सासाराम, जि. रोहतास, बिहार) आणि शुभम तुफानी सिंह (वय ३८, रा. मांगडेवाडी, सातारा रोड, कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धंदे, वेश्या व्यवसाय बोकाळला असल्याच्या तक्रार पोलिसांकडे आल्या आहेत. शहराच्या उपनगरात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने हा व्यवसाय सुरु असल्याचे सांगितले जाते. तशा तक्रारीही नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन शहरात सुरु असलेल्या बेकायदा वेश्या व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी सामाजिक सुरक्षा विभागाला दिले.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’27f99ed5-aa7b-11e8-a6e0-03f0b82974c3′]

नवले पुलाजवळील स्वागत लॉज येथे वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्याची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. एका बनावट ग्राहकाला तेथे पाठविण्यात आले. या ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. तेथे पुण्यात राहणाऱ्या २८ ते ३० वर्षाच्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या मयंककुमार पांडे आणि शुभम सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मयंककुमार पांडे आणि शुभम सिंह हे दोघेही या लॉजमधील कामगार आहेत. गरीब आणि पैशाची चणचण असलेल्या महिलांना ते हेरुन यातून चांगले पैसे मिळतील असे सांगून त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावत होते. या तीनही महिला गरीब घरातील असून घरोघरी मोलमजूरीचे काम त्या करतात. त्यांना ते लॉजवर ठेवून घेऊन गिऱ्हाईकांना त्यांच्याकडे पाठवत होते.

याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार प्रकाश विश्वनाथ लोखंडे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव अधिक तपास करीत आहेत.

इंधनाचे दर कोसळल्याने व्हेनेझुएलात चलनवाढीचा दर १० लाख टक्क्यांवर

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like