पंचतारांकित हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन- बहुतारांकित हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ही कारवाई नागपूर गुन्हे शाखेने वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये करण्यात आली. या कारवाईत एका महिला दलालास अटक केली असून एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे.

पूजा जितेंद्र रॉय असे अटक करण्यात आलेल्या दलाल महिलेचे नाव आहे. पूजा रॉय हिला नोव्हेंबरमध्ये पूनम चेंबरजवळून अटक केली होती. जामिनावर बाहेर येताच ती पुन्हा सक्रिय झाली.

पूजा रॉय ही तरुणींकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला. एका बनावट ग्राहकाला दलाल महिलेशी संपर्क करण्यास सांगितले. दलाल पुजाने ग्राहकाला मुलीचे छायाचित्र त्याला पाठवले. एक मुलीची निवड करण्यात आली. तासाला 10 हजार रुपये ठरले. ग्राहकाडून दलाल महिलेने पैसे स्वीकारले आणि रॅडिसन ब्लू हॉटेलच्या 202 क्रमांकाच्या खोलीत जायला सांगितले. पंटर खोलीत पोहोचताच त्याला मुलगी मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी दलाल महिलेला अटक केली. देहव्यवसायात सापडलेली तरुणी कोलकत्त्याची आहे. तिला 15 दिवसांपूर्वी नागपूरला बोलावण्यात आले होते. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून तिने आतापर्यंत तीन हॉटेल बदलले होते.

पूजा रॉय हीचे इतर राज्यांत सेक्‍स रॅकेट चालविणाऱ्या दलालांशी तिचे संबंध आहेत. वेबसाइटवर ती तरुणी उपलब्ध असल्याची माहिती ग्राहकांना देते. ती स्कोका नावाच्या ऑनलाइन साईटवर जाहिरात देऊन ग्राहकांना बोलावते.