इंटीरिअर डिझाइनच्या नावावर सुरू होतं व्हर्च्युअल सेक्स रॅकेट; अंगप्रदर्शनाची दिली जायची ट्रेनिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंटीरिअर डिझायनिंग आणि आर्किटेक्टच्या नावाखाली व्हर्च्युअल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा गुजरात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रे-डिज़ाइन वर्ल्डच्या नावाखाली देहविक्रीचं घाणेरडं काम सुरू होतं. एएनआयच्या वृत्तानुसार, वडोदरा पोलिसांनी रे-डिझाइन वर्ल्डच्या नावाखाली देहविक्रीचं घाणेरडं काम चालविणारा मास्टरमाइंड नीलेश गुप्ता याला अटक केली आहे, तर त्याची साथीदार अमी परमार फरार झाली आहे.

गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या व्यवसायाची माहिती पोलिसांसमोर उघडकीस आली असून, त्यात असे आढळून आले की, विविध राज्यांतील गरजू मुलींना पॉर्न वेबसाइटवर अंगप्रदर्शनाचे प्रशिक्षण दिले जात होते. हा संपूर्ण खेळ नीलेश गुप्ताच्या रशियन पत्नीच्या अकाउंटवरून चालत होते, ज्यामध्ये बिटकॉइनद्वारे व्यवहार केले जात होते.

डीसीपी संदीप चौधरी यांनी सांगितले की, पोलिसांनी सव्वा कोटी रुपयांचे 30 बिटकॉइन वॉलेट आणि 9.45 बिटकॉइन जप्त केल्या आहेत. यासह अनेक लॅपटॉप, वेबकॅमही वसूल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेक्स रॅकेटमध्ये आणखी बरेच लोकं सामील आहेत, ज्यांचा आपापसांत शोध लावला जात आहे.