स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन –   स्पा आणि सलूनच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex racket) पर्दाफाश भोपाळ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला आहे. येथील कोलार भागातील लंडन स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी येथून तीन महिलांसह पाच आरोपींना अटक केली आहे.
याबाबत क्राइम ब्रांचचे एसपी गोपाल धाकड म्हणाले की, आम्हाला काही दिवसांपूर्वी येथील लंडन स्पा सेंटरमध्ये स्पा आणि सलूनच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या भागातील लंडन स्पा येथे कारवाई करण्यात आली. यात तीन महिलांसह पाच आरोपींना अटक केली आहे. पकडलेल्या महिला या नागपूर, नेपाळ आणि भोपाळमधील राहणाऱ्या आहेत. ज्या महिला येथे सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकल्या होत्या. या महिला भोपाळ स्पा सेंटरच्या ऑर्डरवरून जात होत्या. घटनास्थळावरून अटक केलेले पुरुष हे भोपाळमधील बैरागढचे निवासी आहेत.

दरम्यान, यापूर्वी भोपाळ पोलिसांनी ब्यूटी पार्लर, स्पा आणि सलूनमध्ये सुरू असलेला काळा धंदा उघडकीस आणला आहे. गेल्या वर्षी अशाच एका स्पा सेंटरवर कारवाई केली होती. संपूर्ण शहरात सेक्स रॅकेटचा व्यवसाय एखाद्या जाळ्याप्रमाणे पसरत आहे.

You might also like