काय सांगता ! होय, ‘इथं’ चक्क क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाने जगभरात थैमान घालत असून ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये कोरोनाच्या संक्रमणाची एक विचित्र घटना घडली, मेलबर्नमधील काही हॉटेल्स हे कोरोना रूग्ण आणि संशयितांसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरले जात आहेत. मात्र आता या हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील या हॉटेल्समध्ये परदेशातून येणार्‍या लोकांना ठेवण्यात आले होते. मात्र या हॉटेल्समध्ये सेस्क रॅकेट सुरू करण्यात आले, परिणामी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. आता राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, मे आणि जूनच्या सुरुवातीला झालेल्या कोरोना संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे या सेक्स रॅकेटमुळे आढळून आली. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियामधील नागरिक आणि कायमस्वरुपी रहिवाशांना देशात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जो कोणी ऑस्ट्रेलियात येईल त्याला 14 दिवस क्वारंटाइन राहण्याचा नियम आहे. यासाठी बहुतांश हॉटेल्समध्ये क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, कारण मुंबई व इतर देशातील हजारो लोक येथे येत आहेत. भारतातील मुंबईहून 300 अ‍ॅडलेडला किमान 300 लोक येत आहेत, तर दक्षिण अमेरिका आणि इंडोनेशियातून शेकडो लोक येत आहेत.