‘न्यूड फोटो’च्या SMS ला बळी पडू नका, बसू शकतो ‘असा’ फटका, जाणून घ्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात माणूस स्वतःसाठी जे तंत्रज्ञान बनवत असतो त्याचा वापर चांगल्यासाठी देखील होतो आणि त्याचा गैरवापर देखील मोठ्या प्रमाणावर होत असतो. अनेक व्हायरस आपल्या मोबाईल फोन आणि कॉम्प्युटरमध्ये सोडून आपल्याला ब्लॅकमेल केले जाते. अशाच प्रकारचा एक नवीन व्हायरसचा शोध लागला असून स्लोवाकिया येथील सायबर सिक्युरिटी रिसर्च कंपनीने नव्या व्हायरसचा शोध लावला आहे.

या व्हायरसच्या मदतीने आणि सेक्स सिमुलेटर अ‍ॅपच्या मदतीने स्पॅम टेक्स्ट पद्धतीचे मॅसेज पाठवले जातात. यामध्ये तुम्हाला सेक्शुअल पद्द्तीचे मॅसेज पाठवून तुमचा डेटा आणि माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर तुम्हाला याद्वारे ब्लॅकमेल देखील केले जाऊ शकते. या व्हायरसचे नाव  रँसमवेअर असून यामार्फत तुम्हाला अनेक प्रकारचे सेक्स सिम्युलेटर आहेत. या प्रकारच्या मॅसेजवर किंवा त्यातील लिंकवर क्लिक केल्यास तात्काळ तुमचे अकाउंट हॅक होऊ शकते किंवा तुमच्या डेटावर हल्ला केला जाऊ शकतो.

या पद्धतीने पाठवले जातात मॅसेज

या  पाठवण्यात येणाऱ्या मेसेजमध्ये तुमचे नाव देखील असते. त्याचबरोबर तुमचे काही न्यूड फोटो क्लिक झाले असून खालील लिंकवर क्लिक केल्यास ते तुम्हाला दिसतील असा मॅसेज पाठवला जातो. त्यानंतर तुम्ही क्लिक केल्यास तुमचा फोनमधील डेटा हॅक करून ते त्यानंतर तुम्हाला ब्लॅकमेल देखील करू शकतात.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत किती जणांना याचा फटका बसला आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा डेटा हॅक केल्यानंतर अटॅकर त्यांना धमकी देऊन पैशांची मागणी करतात. जर आपण त्यांना पैसे न दिल्यास ते डेटा डिलीट करण्याची तसेच तो व्हायरल करण्याची धमकी देतात. त्यामुळे कुणीही अशा प्रकारच्या मॅसेजला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –