या देशात सेक्स वर्कर्सचं आंदोलन, म्हणाल्या – ‘काम पुन्हा सुरू करण्याची द्या परवानगी’

हॅम्बर्ग : पोलीसनामा ऑनलाइन  –  जर्मनीच्या सुमारे 400 वेश्यांनी आणि वेश्यालय संचालकांनी शनिवारी कोरोनो व्हायरसच्या प्रकोपामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली वेश्यालये (रेड लाईट एरिया) पुन्हा एकदा उघडण्याची मागणी करत हॅम्बर्गच्या रेड लाइट जिल्ह्यात निदर्शने केली. जर्मनीमध्ये दुकाने, रेस्टॉरंट आणि बार सर्वांना अनेक महिन्यानंतर पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. अशावेळी जर्मनीत देहविक्रय करणार्‍यांचे म्हणणे आहे की, जर्मनीत वेश्या व्यवसाय कायदेशीर वैध आहे आणि त्यांच्या कामामुळे कोणालाही मोठी आरोग्य जोखीम नाही, यासाठी सरकारने आम्हाला पुन्हा आमचे काम सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे.

हर्बर्टस्ट्रास रस्त्यावर जोरदार आंदोलन

शनिवारी एका रेड लाईट एरियात हर्बर्टस्ट्रास रस्त्यावर देहविक्रय करणार्‍या महिलांनी आणि वेश्यालय संचालकांनी गर्दी केली होती. हे लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपला विरोध दर्शवत होते. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे मार्चपासून हा संपूर्ण परिसर पूर्णपणे बंद होता. एका वेश्यालयाच्या खिडकीवर एक बोर्ड लटकवण्यात आला होता, ज्यावर लिहिले होते की, सर्वात जुन्या व्यवसायाला तुमच्या मदतीची गरज आहे. तर काही आंदोलकांनी थिएटर मास्क घातले होते.

सेक्स वर्करनी व्हायोलिनवर गायली गाणी

एक अन्य सेक्स वर्करने आपल्या नाईट लाईफसाठी प्रसिद्ध रेपरबॅन नावाच्या गल्लीच्या कोपर्‍यावर व्हायोलिनवर गाणी गायली. आंदोलनाचे आयोजन असोसिएशन ऑफ सेक्स वर्कर्सद्वारे करण्यात आले होते. या संघटनेचे म्हणणे आहे की, लायसन्स असलेले परिसर सतत बंद असल्याने वेश्यांना नाईलाजाने रस्त्यावर येऊन काम करावे लागले. हा एक बेकायदेशीर प्रकार आहे, जो जास्त धोकादायक आणि आरोग्यासाठी सुद्धा योग्य नाही.

सेक्स वर्कर्सची स्थिती दयनीय

या संघटनेच्या सदस्य जोहाना वेबर यांनी डीपीए वृत्तसंस्थेला सांगितले की, ज्याप्रकारे युवक या प्रकरणात राजकीयदृष्ट्या सहभागी होत आहेत, ते प्रशंसनीय आहे आणि त्यांचे समर्थन स्थितीचे गांभिर्य दर्शवते. सेक्स वर्कर्सने खुप मोठ्या कालावधीपर्यंत कोरोना व्हायरस प्रतिबंधाच्या बाबतीत धैर्य दाखवले. परंतु, आता स्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात आहे.

जर्मनीच्या जवळपासच्या अनेक देशात वेश्या व्यवसायाला परवानगी मिळाली आहे. अनेक शेजरी देशांमध्ये वेश्यालये पुन्हा उघडली आहेत. स्विझरर्लंडमध्ये आता वेश्या व्यवसायाठी चार आठवड्यांसाठी पुन्हा परवानगी मिळाली आहे आणि तेव्हापासून तेथे वेश्यालयासंबंधी कोरोनाचे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही. सेक्स वर्कर्सच्या संघटनेने म्हटले की, अन्य उद्योगांप्रमाणे वेश्यालयांसाठी सुद्धा कोरोना व्हायरस सुरक्षा उपाय लागू करावेत. जसे की फेस मास्कची आवश्यकता, खेळती हवा असलेल्या खोल्या आणि वेश्यालयात येणार्‍यांची नोंदणी ठेवणे जरूरी आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like