Homeक्राईम स्टोरीमुलींशी अश्लिल वर्तन करणारा दुसरा शिक्षक मोकाट

मुलींशी अश्लिल वर्तन करणारा दुसरा शिक्षक मोकाट

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – उपशिक्षक असलेल्या सूर्यकांत ठाकूर यांच्यावर चाळीसगावातील मुलीला अश्लिल व्हिडीओ क्लिप दाखवून तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अन्य एक शिक्षकाला पाठीशी घालण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सरपंच विलास चौधरी यांनी अशा आणखी घटना शाळेत घडल्या असल्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

चक्क तहसिल कार्यालयात वाळूमाफियांच्या दोन गटात राडा

हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे प्रकार करून पुन्हा शिक्षक दादागिरीची भाषा वापरत असल्याने २०० पेक्षा अधिक लोकांचा जमाव शाळेवर चालून गेला होता. शिक्षक असते तर त्यांना लोकांनी मारलेदेखील असते. हा प्रकार पोलीस पाटील रहाटे यांनी पोलिसांना कळविला. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या सूर्यकांत ठाकूर या शिक्षकावर मुलीचे पोलीस ठाण्यात जाबजवाब नोंदवल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना घडल्यानंतर लागलीच लोकांनी मुख्याध्यापकांना तंबी दिली होती. दोघा शिक्षकांची तत्काळ बदली करा, अन्यथा शाळा चालु देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र यावर साधी चौकशी करण्याचे धाडसदेखील संस्थेच्या संचालक मंडळाने दाखवले नाही. घडलेली घटना अतिशय संवेदनशील आणि तितकीच संतापजनक आहे. शालेय मुलींशी गैरवर्तन कदापी खपवून घेण्यासारखं नाही. म्हणून जो असेल तो कुणीही असो, त्याची गय संस्था करणार नाही. याने संस्थेची बदनामी होत आहे. गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकासह अन्य एका शिक्षकाची तक्रार व्यवस्थापनाला मुख्याध्यापकाकडून प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे सहसचिव संजय देशमुख यांनी दिली आहे.

जाहीरात

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News