लैंगिक अत्याचार करून , जातीचे कारण पुढे करत लग्नास नकार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून, जातीचे कारण देत लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली आणि लातूर येथे घडली.पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अक्षय हनुमंत साकोरे (रा. मोईगाव, ता. खेड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय याने लग्न करण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जोडले. त्यातूनच तिच्यावर चिखली आणि लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडा अहमदपूर येथे वेळोवेळी अत्याचार केले. तसेच अल्पवयीन मुलीला अहमदपूर लातूर येथे पळवून नेले आणि तिथेही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीची जात माहिती झाल्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अपहरण, बलात्कार, पॉस्को आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिखली पोलिस करीत आहेत.