संतापजनक ! साताऱ्यात सावत्र पित्याकडूनच मुलीवर अत्याचार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या एका सावत्र पित्यानंच आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी संबंधितावर अत्याचार तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या महिलेचं व संशयीताचं लग्न झालं आहे. पीडिता ही त्या महिलेच्या पहिल्या पतीची मुलगी आहे. हे सर्वजण मिळून एकत्र राहत आहेत.

23 ते 29 ऑगस्ट दरम्यान पीडित मुलगी घरात एकटी होती. संशयित पित्यानं तिच्यावर अत्याचार केले. इतकंच नाही तर जर तिनं कोणाला काही सांगितलं तर तिला ठार करण्याची धमकीही दिली असं फिर्यादीत म्हटलं आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.