महाभयानक ! युवतीने सांगितली बॉसच्या लैंगिक अत्याचाराची ‘स्टोरी’, दर 3 महिन्याला करायचा ‘गर्भपात’

रांची : वृत्तसंस्था – भारतात महिलांवर मोठया प्रमाणात अत्याचार होत असतात. यात लहान मुलींचा देखील समावेश असतो. लैंगिक अत्याचार आणि बलात्कार यांसारख्या घटना भारत मोठ्या प्रमाणावर घडत असताना या प्रकरणांत गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याचे प्रमाण फार कमी आहे. अशाच प्रकारची आणखी घटना झारखंडमधील रांची येथे घडली आहे. येथील एका सर्व्हिससेंटर मधील महिलेवर तिच्या बॉसने तिच्यावर अनन्वित लैंगिक अत्याचार केले आहेत. तिचा बॉस दर तीन महिन्याने तिचा गर्भपात करायाचा अशी धक्कादायक माहिती पीडित महिलेने दिली आहे.याविषयी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

या सर्व्हिससेंटर मधील एका अधिकार्‍याची ती तरुणी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करत होती. मागील वर्षी एक दिवस तिच्या बॉसने तिला केबिनमध्ये बोलावून कोल्डड्रिंक प्यायला दिले. यानंतर ती बेशुद्ध पडली. शुद्धीत आल्यानंतर तिला कंबरेच्या खाली दुखत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तिच्या बॉसने लॅपटॉपवर तिचे काही अश्लीच छायाचित्रे आणि व्हीडिओ दाखवले आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर त्याचे हे अत्याचार हे सुरूच राहिले. त्यानंतर देखील त्याने अनेक वेळा तिच्यावर अत्याचार करून बळजबरी तिचा गर्भपात देखील केला.त्यानंतर त्याने तिला कामावरून काढून टाकले.

दरम्यान, त्याने तिला कामावरून काढून टाकल्यानंतर तिने बॉसच्या पत्नीकडे याविषयी तक्रार करून संपूर्ण हकीकत तिला सांगितली. मात्र तरुणी खोटे आरोप करत असल्याचे त्याने आपल्या पत्नीला सांगितल्याने त्याच्या पत्नीने देखील तिला हाकलून दिले. त्यानंतर आता न्यायालयात हे प्रकरण असून त्याच्यावर खटला चालवण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

#Video : ‘या’ फॉरेनरचा बॉलिवूड गाण्यावरील ‘बोल्ड डान्स’ होतोय प्रचंड व्हायरल

#Video : रिअल लाफफमध्ये खूपच ‘हॉट’ आहे ‘खिलाडी’ अक्षयची ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटोज, व्हिडीओज