धक्कादायक ! बंदुकीचा धाक दाखवत पोलिसाने केला बलात्कार; महिलेची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –  उस्मानाबाद येथे एका ३२ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मृत्यूपूर्वी या महिलेने एक सुसाईड नोट सुद्धा लिहिली आहे. त्यामध्ये तिने उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने वेळोवेळी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हणले आहे.

या कर्मचाऱ्याचा त्रासाला वैतागूनच महिलेने आत्महत्या केल्याचे या सुसाईड नोटमधून स्पष्ट झाले आहे. यानंतर या महिलेच्या पतीने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये संबंधित पोलिसाने सप्टेंबर २०२० पासून वेळोवेळी बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. त्यानुसार,पोलिसाकडून आरोपीवर लैंगिक अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा करण्यात आला आहे.