पुणे : शितपेयातून दारू पाजून घरकाम करणाऱ्या महिलेवर सामुहिक बलात्कार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – स्वयंपाक करणाऱ्या महिलेला शितपेयातून दारू पाजून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथे घडला आहे. याप्रकणी पाच जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.९) घडली. तर लैंगिक अत्याचाराची तक्रार देणाऱ्या महिलेने घरामध्ये चोरी केल्याची तक्रार बारामती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी लग्नाचा वाढवदिवस असल्याचे सांगून स्वयंपाकासाठी बोलावून घेतले. घरातील सर्व महिलांचे जेवण झाल्यानंतर आरोपींनी शितपेयातून दारू पाजली. यानंतर झोपेत असताना लैंगिक अत्याचार केले. तसेच शिवीगाळ करून मारहाण करत दहा हजार रुपये कढून घेत घरातून हाकलून दिले.

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेनेच आपल्या घरातील तीन हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर घरात चोरी केल्याप्रकरणी पीडित महिलेवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती पोलीस करीत आहेत.

You might also like