Akola : बॅडमिंटन प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन
प्रत्येक पालक आपल्या मुलाचे भविष्य उजवळ असावे यासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबीर किंवा वर्गांना घालतात. त्याच प्रशिक्षकांनी जर आपल्या विद्यार्थीनींचा विश्वासघात केला तर समाजात अल्पवयीन मुलींनी कसे सुरक्षित राहावे. अकोल्यातील एका बॅडमिंटन प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार सिव्हिल लाइन्स रोडवरील आयएमए हॉलमध्ये घडला आहे. राहुल सरकटे असे आरोपीचे नाव असून त्याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे.

प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली आरोपी हा बॅच संपल्यावर पीडित मुलीला थांबायला सांगून तिच्यासोबत अश्लील चाले करत आणि जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवले. हा आरोपी गेल्या काही वर्षांपासून पीडितेवर लैंगिक अत्याचार करत होता. मात्र नेहमीच होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा त्रास असह्य झाल्याने पीडितेने आरोपीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतल्यावर अनेक खुलासे समोर आले. आठव्या इयत्तेत शिकत असताना पीडिता बॅडमिंटनचा सराव करायला सुरुवात केली. त्यानंतर ऑफिसर क्लबमध्ये आरोपी राहुल सरकटेची पीडितेसोबत ओळख झाल्याचे तिच्या जबाबात म्हटले आहे.

आरोपी सरकटे याने सिव्हिल लाईन्स येथील आयएमए हॉल येथे बॅडमिंटन हॉल प्रशिक्षण वर्ग चालविण्यासाठी घेतला. त्याच्याकडे २० प्रशिक्षणार्थींची बॅच होती. ऑक्टोबर २०१३ मध्ये आरोपीने पीडितेसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिला सतत धमकावत होता. आरोपीने पीडितेचे अश्लिल छायाचित्रही काढली होती. त्यावरूनच आरोपी पीडितेला धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले.

दरम्यान, पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी राहुल सरकटे याला अटक केली व न्यायालयात हजर करण्यात आले.