‘कामा’च्या शोधात आलेल्या महिलेचं ‘लैंगिक’ शोषण, तिला दोनदा ‘त्या’साठी विकलं

गोंदिया, पोलीसनामा ऑनलाइन – रोजगारासाठी गोंदियात आलेल्या एका 27 वर्षीय महिलेचे चार महिने लैंगिक शोषण करुन तिची विक्री करण्यात आल्याची घटना घडली. दोन वेळा विक्री करण्यात आल्यानंतर तिसऱ्यांदा महिलेची विक्री करण्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपींचा डाव फसला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या चान्ना बाक्टी येथील 27 वर्षाची महिला चार ते पाच वर्षांपूर्वी गोंदिया येथे मजुरीचे काम करण्यासाठी आली होती. परंतु रामनगर येथील ओमप्रकाश नावाच्या इसमाने तिला आपल्या घरी कामासाठी ठेवून घेऊन तिच्या इच्छेविरोधात लैंगिक शोषण केले, त्यानतंर ओमप्रकाश यांनी तिची ओळख रामनगरमधीलच तिघांना करुन दिली.

यानंतर आरोपी लाखन, किरण आणि लगडा या तिघांनी महिलेला मध्यप्रदेशच्या राघोगड येथील सुनिता उदमसिंह मिना, उदमसिंग गप्पूलाल मिना आणि बुढ्ढीबाई हरिचरण सैनी यांना 80 हजार रुपायंना विकले. त्या आरोपींनी विकत घेतल्यानंतर तिला पुन्हा संदीप हरिचरण सैनी आणि हरिचरण नाथूलाल सैनी यांना पैसे घेऊन विकले. त्यानंतर आरोपी संदीप सैनी याने त्या महिलेला काही दिवस पत्नी म्हणून ठेवले आणि तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर तिला पुन्हा सुनिता उदमसिंह मिना या महिलेले विकले. तिने पुन्हा दोन मुलांशी सौदा करुन तिला विकण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला. याची भनक लागताच पीडितेने तेथून पळ काढला.

पळा काढलेल्या पीडितेने चाचोडा पोलीस ठाणे गाठून पोलिसांना संपूर्ण माहिती दिली. पोलिसांना महिलेची तक्रार दाखल करुन घेतली आणि 15 डिसेंबरच्या रात्री संबंधित 8 आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नोकरी देण्याचे अमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले. ग्रामीण भागातील महिला नोकरीच्या शोधात येतात परंतु त्यांना नोकरीचे आमिष दाखवून देहव्यवसाय करण्यात प्रवृत्त केले जाते. ती पीडित महिला 5 महिन्यांनी घरी पोहचली.

देहव्यवसायात ओढणारी टोळी सक्रीय –
महिलांच्या लाचारीचा फायदा घेत त्यांना देह व्यवसायात ओढण्याचा प्रयत्न होतो. महिलांना देहविक्री व्यवसायात ओढून त्यांच्या सौंदर्यांचा फायदा घेत त्यांनी हरियाणा, मध्यप्रदेश येथे विक्री केली जाते. या देहविक्रीच्या व्यवसायावर पोलीस कसा लगाम लावणार हा प्रश्न उपस्थित होतो.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/