धक्‍कादायक ! मदरशात मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात महिला आणि मुलींवर अत्याचाराचे प्रमाण हे वाढतच आहे. ज्या प्रमाणात अत्याचार होताना दिसून येत आहेत त्या प्रमाणात गुन्हेगारांना शिक्षा होत नसल्याने गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले आहे. देशभरात महिलांवर अत्याचार होत असताना मालेगाव शहरातील एका मदरशामध्ये दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले असून फक्त मुलींसाठी हा मदरसा चालविला जात होता.

याप्रकरणी पोलिसांनी या मदरश्याच्या व्यवस्थापकासह दोन महिलांना अटक केली आहे. एकीकडे समाजात मुलींची संख्या वाढवण्याचा संदेश देताना मुलींवरील अत्याचार मात्र कमी होताना दिसून येत नाहीत. पीडित मुलगी ही मुंबईच्या मालाड परिसरातील असून अतिशय गरीब घरातील ही मुलगी असल्याने तिला या मदरशात शिक्षणासाठी पाठवले होते. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच या मुलीला या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून या प्रकरणात व्यवस्थापक, त्याची पत्नी आणि एका महिला कर्मचाऱ्यासह एका मुलाला देखील ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यवस्थापकाच्या घरी त्या मुलीला कामासाठी बोलावण्यात आल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. या घटनेतील पीडित मुलीला सध्या नाशिक येथील बाल सुधारगृहात ठेवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा…होतील हे चांगले परिणाम

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

आरोग्याच्या किरकोळ समस्यांवर करा ‘हे’ नैसर्गिक उपचार

‘या’ कारणांमुळे येऊ शकतो ‘अकाली बहिरेपणा’, अशी घ्या काळजी

केसांचे नुकसान का होते ? जाणून घ्या या समस्येमागील कारणे

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ