Sexual Harassment In Ruby Hall Clinic | रूबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणार्‍या महिलेचा लैंगिक छळ; रूबीच्या एचआर मॅनेजरसह टेक्निशीयनवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Sexual Harassment In Ruby Hall Clinic | रूबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणार्‍या महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी रूबी हॉस्पीटलच्या एचआर मॅनेजर (HR Manager Ruby Hospital) आणि टेक्निशीयीनवर (Technician Of Ruby Hospital) विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Crimes Against Women). यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Sexual Harassment In Ruby Hall Clinic)

रूबी हॉस्पीटलमधील एच आर मॅनेजर प्रभाकर श्रीवास्तव (HR Manager Prabhakar Srivastava) आणि टेक्निशीयीन बाळकृष्ण शिंदे Technician Balkrishna Shinde (रा. बिबवेवाडी) यांच्याविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात (Koregaon Park Police Station) भादंवि 354, 509, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रूबी हॉस्पीटलमध्ये काम करणार्‍या 45 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना रूबी हॉस्पीटलमधील युरो डिपार्टमेंट (Uro Department Ruby Hall Pune) आणि एच आर विभागात दि. 21 एप्रिल 2023 रोजी आणि एप्रिल 2023 च्या शेवटच्या आठवड्यात घडली आहे. (Sexual Harassment In Ruby Hall Clinic)

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत महिला या रूबी हॉस्पीटलमध्ये काम करत असताना बाळकृष्ण शिंदेने त्यांना अश्लील हातवारे करून डोळा मारून माझेशी शरीर संबंध ठेव नाही तर मी तुला हॉस्पीटलच्या कामावर टिकु देणार नाही असे बोलून त्यांचा विनयभंग केला. सदरील कृत्याबाबत फिर्यादीने हॉस्पीटल प्रशासनाकडे तक्रार अर्ज केला. तक्रार अर्जाच्या चौकशीत एच आर मॅनेजर प्रभाकर श्रीवास्तव यांनी फिर्यादीस तु खोटे बोलत आहे. तुझ्या डावे हातावर व अंगावर किती डाग आहेत हे सगळे मला माहित आहे. असे बोलून त्याने देखील फिर्यादीचा विनयभंग केला.

शिंदे आणि श्रीवास्तव यांच्यावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून
गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक इंगोले करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : सोसायटीची जागा स्वतःची असल्याचे सांगितले, पैसे घेऊन तरुणाची आर्थिक फसवणूक; दाम्पत्यावर FIR