महाविद्यालयातील ११ मुलींचे लैंगिक शोषण, आरोपीस अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

ठाणे खंडणी विरोधी पथकाने ११ महाविद्यालीयन तरुणींवर लैंगिक अत्याचार करुन त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. माझ्यावर प्रेम केले नाही, तर मी विष पिऊन आत्महत्या करीन असे मेसेज पाठवून हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता. नंतर त्यांच्याशी शरिरसंबंध ठेऊन नग्न फोटो काढून ब्लॅकमेल करत होता. अखेर एका पीडित तरुणीने आवाज उठविल्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या.

[amazon_link asins=’B00DRLASZ6,B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d1b485ed-ada8-11e8-af32-53ed9ca705e9′]

आतापर्यंत आरोपीने महाविद्यालयातील ११ मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. अटक आरोपीचे नाव गौरव मोरे असून तो मुंबईच्या दादर नायगाव परिसरात राहतो. गौरव मोरेला आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात हा धक्कादाय प्रकार घडला आहे. या महाविद्यात शिक्षण घेत असलेला आरोपी गौरव मोरे हा महाविद्यालयातीलच मुलींना आत्महत्या करेन असे धमकावून प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता. त्यानंतर मुलींना ब्लॅकमेल करत होता. विशेष म्हणजे आरोपी गौरव मोरे हा तरुणींवर महाविद्यालयाच्या आवारातच अत्याचार करत असे. ब्लॅकमेल करत असताना तो तरुणींकडून पैसेही उकळत होता.

येरवडातील लॉजमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

गौरव मोरे अशाच प्रकारे महाविद्यालयातील एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करत होता. तिच्याकडे त्याने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. ठाण्यातील या तरुणीने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केल्यानंतर आरोपी गौरव मोरेच्या कृत्याचा पर्दाफाश झाला. तरुणीच्या या धाडसामुळे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. ठाणे खंडणी विरोधी पथकाने आरोपी गौरव मोरेला अटक करून त्याच्याविरोधात खंडणी, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे.