स्वच्छतागृहात शिक्षीका गेल्यानंतर ‘लपूनछपून’ व्हिडीओ काढणारा ‘गोत्यात’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकच्या वसंतराव नाईक कॉलेजमध्ये आज एक संतापजनक प्रकार घडला आहे. कॉलेजच्या महिलांच्या स्वच्छतागृहात सुरक्षारक्षकानेच शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षाने फोटो काढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे कॉलेजमधील विद्यार्थ्यांनीच नाही तर सर्व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटेनंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुरक्षारक्षकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

अनिल पवार असे आरोपीचे नाव असून तो कॉलेजमध्ये कंत्राटी सुरक्षारक्षक आहे. अनिल पवार हा पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून महिलांच्या स्वच्छतागृहातील शिक्षिकेचे मोबाईलच्या सहाय्याने कपडे बदलतानाचे चित्रीकरण करत होता. त्यावेळी त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाल्याने महिला शिक्षकेला संशय आला. तिने वर पाहिले असता पवार याचा हात आणि मोबाईल दिल्याने तिने आरडाओरड करत बाहेर पळ काढला.

शिक्षिकेने आरडाओरडा केल्याने घाबरलेल्या पवारने तेथून पळ काढला असता कॉलेज आवारातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. तसेच पोलिसांना बोलावून घेत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी अनिल पवार विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like