नामांकित शाळेच्या शौचालयात शिक्षिकेच्या मुलाचे लैंगिक शोषण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेच्या शौचालयातच शिपायाने शिक्षिकेच्या ७ वर्षीय चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचबरोबर घडलेल्या या प्रकाराबाबद कुठे वाच्यता केल्यास जिवेमारण्याची धमकी देखील त्याने दिली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी सनी रमेश टाक (वय -३०) नामक शिपायाला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदयाअंतर्गत (पॉक्सो) तसेच धमकाविल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

चेंबूर येथील नामांकित शाळेत हा प्रकार घडला. या घटनेतील आरोपी रमेश टाक गोवंडी येथील रहिवासी असून तो या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होता. तक्रारदार याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांचा सात वर्षांचा मुलगा देखील याच शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकतो. बुधवारी तक्रारदार यांचा मुलगा शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुरुषांच्या शौचालयाकडे गेला असता रमेशची वाईट नजर त्याच्यावर पडली. आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत, रमेश लगेच त्याच्या पाठोपाठ शौचालयात गेला. शौचालयात जावून त्याने या चिमुकल्यासोबत अश्लील चाळे केले.

मुलाने जोरजोरात रडण्यास सुरुवात करताच, आरोपीने त्याला दम दिला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला मारून टाकेल अशी धमकी देखील त्याने मुलाला दिली. मात्र, मुलाने रडतरडत त्याच शाळेत शिक्षिका असलेल्या त्याच्या आईकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार आईने बुधवारी रात्री चेंबूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिपायाविरुद्ध पॉक्सो, धमकाविण्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या बाबद अधिक तपास सुरु आहे.

Loading...
You might also like