तृतीयपंथीनेच केला तृतीयपंथीवर लैगिक अत्याचार; दोन गटातील वादातून मारहाण करुन लुटले

पिंपरी :पोलीसनामा ऑनलाइन – एकमेकांचे गट सोडल्याने तृतीयपंथी(Tertiary)यांमध्ये वाद होऊन त्यात दोन जणांना मारहाण करुन त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून मोबाईल व रोकड जबरदस्तीने चोरुन नेण्यात आले. याप्रकरणी वाकड पोलिसांनी ७ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केल आहे. ही घटना थेरगाव येथे सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली.

याप्रकरणी एका तृतीयपंथीने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुक्सार ऊर्फ इरफान इन्साफ खान, आजम शेख (दोघे रा. गोवंडी, मुंबई), अनम, सिमरन ऊर्फ पवन (रा. गोवंडी, मुंबई) व तीन अनोळखी पुरुष अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. तृतीयपंथींमध्येही आपापले गट, पतीपत्नी असतात. एकमेकांशी न पटल्यावर ते दुसऱ्याकडे जात असतात. त्यातून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत असतात. आजम शेख हा आरोपी रुक्सार खान हिचा पती आहे.

पोटाचा घेर कमी करायचाय ? आहारात करा घोसाळ्याचं सेवन ! जाणून घ्या इतर फायदे

तसेच रुक्सार खान ही फिर्यादीची पूर्वीची गुरु आहे. त्यांनी एकमेकांचा गट सोडल्यावरुन त्यांच्यात वाद होता. यावरुन थेरगाव येथील फिर्यादी हिच्या घरी सोमवारी दुपारी अडीच वाजता त्यांच्यात वाद झाला. त्यात फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला आरोपींनी चॉपर उलटा मारुन जखमी केले. तसेच फिर्यादी व तिच्या मैत्रिणीकडील मोबाईल व फिर्यादीकडील ३० हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच आजम याने फिर्यादीच्या मैत्रिणीवर अनैसर्गिक अत्याचार केले. पोलिसांनी ७ जणांवर अनैसर्गिक कृत्यासह दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

READ ALSO THIS :

 

Black Fungus : कोरोनातून रिकव्हरीनंतर सुद्धा होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

‘या’ कारणामुळे वाढते वजन, जाणून घ्या

घरगुती LPG गॅस सिलेंडर आज ‘स्वस्त’ झाला की ‘महाग’; जाणून घ्या 1 जूनचे दर

वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक